top of page

कोंबडी वडे

  • Writer: architnagwekar
    architnagwekar
  • Jun 12, 2020
  • 2 min read

Updated: Jun 16, 2020

कोकणी वडे (कोंबडी वडे / मालवणी वडे )



तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे आमच्या कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे हि कॉम्बो डीश "कोंबडी वडे " म्हणून प्रसिध्द आहे.

हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे " म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा किंव्हा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात. तुम्हाला एक गम्मत सांगू का ………चहसोबत पण मस्त लागतात. आणि करता करतानाच किती संपतात.


पूर्वतयारी-(वड्यासाठी पीठ बनवणे ):

साहित्य:

जाडा तांदूळ-१ किलो

चणा डाळ - १०० ग्रॅम

उडीद डाळ - ५० ग्रॅम

धणे - १ टेबलस्पून

जीरे - १ टेबलस्पून

बडीशेप- १ टेबलस्पून

मेथी दाणे - १/२ टीस्पून




Create Relevant Content

कृती: तांदूळ स्वच्छ धुवा. निथळून सुती कापडावर पसरऊन वाळउन घ्या. डाळी व इतर पदार्थ धुउन घ्यायची गरज नाही. तांदूळ धुतल्यामुळे वडे मऊ होतात. पण पावसामुळे किंव्हा घाई असेल तर तांदूळ नाही धुतले तरी चालतील. वरील सर्व पदार्थ एकत्र करून गिरणीतून भरड दळून आणावे. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. खरतरं जेंव्हा वडे करायचे असतील तेंव्हाच पीठ दळून आणावे. ताज्या पिठाचेच वाडे चांगले लागतात.

जर तुम्ही परदेशात राहत असाल किंव्हा तुमच्या आसपास गिरणी नसेल तर सुद्धा काही पर्याय आहेत. त्यांचा जरूर वापर करा. १. सर्व पीठ आणि धने पूड वै. सर्व बाजारात उपलब्ध असतात. ते सर्व एकत्र करून वापरता येइल. २. २ कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन आणि ६ उडदाचे पापड भिजऊन कुस्करून पीठ भिजवता येईल. ३. उडदाची डाळ, मेथी दाणे, बडीशेप हे किमान २ तास भिजवायचे आणि खाली दिलेल्या मासाल्यासोबत वाटून तांदळाचे पीठ, बेसन यात एकत्र करून पीठ मळता येईल.

आता पाहू या पाककृतीचा मुख्य भाग…… साहित्य: वड्याच पीठ - ३ कप कांदा- १ मोठा हिरवी मिरची- २ ते ३ कोथिंबीर - मुठभर आलं - १/२ इंच लसूण - ५ ते ६ पाकळ्या हळद- १/२ टीस्पून मीठ- चवीनुसार तेल- तळण्यासाठी आवश्यक

कृती: कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे सगळ वाटून घ्या. (काही लोकं आल- मिरची वै. वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा. ) एका परातीत पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा. सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ झालेलं असेल. एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या. वडे छान फुगतात. काही लोक वडे पिवळे दिसायला हवेत म्हणून व्यवस्थित तळत नाहीत, पण असे वडे कच्चे लागतात . मग वाट कसली पाहताय ……… हे गरमागरम वडे गरम झणझणीत मटणाच्या रश्यासोबत वाढा.

Comments


_edited.jpg

​Archit Nagwekar 

I'm a paragraph. मला कोकण फिरायला आवडते , तसेच कोकणातल्या जागेंची माहिती गोळा करणे आणि youtube video बनवून upload करणे तसेच @konkanmaharashtra नावाचा insta page आहे .

 

Read More

 

Join My Mailing List

Thanks for submitting!

© 2023 by Going Places. Proudly created with Wix.com

  • White Facebook Icon
bottom of page